पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ विद्यमान अध्यक्ष हेमत रासने यांच्या गळ्यात पडली. यानिमित्त महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच रासने हे सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आहेत.या पदाच्या निवडणुकीत भाजपने रासने यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेनेच्या महाविकास आघाडीकडून बंडू गायकवाड रिंगणात होते. या निवडणुकीत रासने यांना दहा आणि गायकवाड यांना
सहा मते मिळाली.